दिल्लीत पाच हजार पाकिस्तानी नागरिक   

इंटेलिजेंस ब्युरोची माहिती; दिल्ली पोलिसांना दिली यादी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून, देशात राहाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इंटेलिजेंस ब्युरोने (आयबी) दिल्लीत राहणार्‍या पाच हजार पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना सोपवली आहे.
 
या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द केले आहेतपरदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) पाकिस्तानी नागरिकांची ही यादी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला सोपवली आहे. पुढील पडताळणी आणि ओळख पटविण्यासाठी ती संबंधित जिल्ह्यातील अधिकार्‍यांना दिली जाणार आहे. या यादीमध्ये ज्यांच्याकडे दीर्घ काळासाठीचा व्हिसा आहे, अशा हिंदू पाकिस्तानी नागरिकांची देखील नावे आहेत. 
 
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला आणि गुप्तचर विभागाला दिल्लीत राहाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच देण्यात आली आहे.
 

Related Articles